कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोमवार दि. १९ रोजी सकाळी माढा सबजेलमधून चार अट्टल कैद्यांनी पलायन केलं आहे. चारही कैदी हे विविध गंभीर गुन्ह्यांची शिक्षा भोगत होते. पळून गेलेल्या कैद्यांच्या तपासासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांची पथके रवाना झाली असून त्यांच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये शोध घेण्यात येत आहे.
Solapur Police; माढा पोलीस स्टेशनच्या सबजेलमधून चार आरोपींनी काढला पळ
सिध्देश्वर शिवाजी केचे, (बनावट चलनी नोटा) (टेभुर्णी पोलीस स्टेशन), अकबर सिद्दाप्पा पवार (बेकायदेशीर पणे हत्यार बाळगणे) ( कुर्डूवाडी पोलीस स्टेशन), आकाश उर्फ अक्षय रॉकी भालेकर (302) ( टेंभुर्णी पोलीस स्टेशन), तानाजी नागनाथ लोकरे (पास्को) ( कुर्डूवाडी पोलीस स्टेशन) असे पळ काढलेल्या चार जणांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवार दि. १९ रोजी सकाळी अकबर सिध्दपा पवार या कैद्याने आजारी पडल्याचा बहाणा केला. यावेळी दरवाजा उघडल्यावर या चार आरोपीने याठिकाणी ड्युटीवर असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार यांना धक्का मारून सबजेलमधून पळ काढला.