fbpx

सिताफळातील जागतिक विश्वसनीय ब्रँड म्हणून मधुबन फार्म अँड नर्सरीचा दुबईत आफताब शिवदासानी यांच्या हस्ते गौरव

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: सिताफळातील जागतिक विश्वसनीय ब्रँड म्हणून मधुबन फार्म अँड नर्सरीचा दुबईत एका कार्यक्रमांमध्ये आफताब शिवदासानी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. येथील युवा कृषीनिष्ठ उद्योजक प्रवीण कसपटे यांचा सिताफळ पिकाच्या याेगदानाबद्दल दुबईतील नावाजलेल्या हयात रेजन्सीच्या सभागृहात दि ॲचीव्हर्स अवाॅर्ड २०२१ अंतर्गत विशेष गाैरव करण्यात आला यानिमित्ताने बार्शीच्या मधुबन फार्म व नर्सरीचा झेंडा दुबईत फडकला.

दुबईच्या हयात रेजन्सी येथे मंगळवारी (ता. १६) रात्री हा दिमाखदार गाैरव साेहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

प्रवीण कसपटे यांना कृषी व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देत असल्याचे यावेळी संयाेजकांनी जाहीर केले. प्रविण कसपटे हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर द्राक्ष व सीताफळे या उत्पादनांना बाजार पेठ मिळवून देणाऱ्या प्रगतशील शेतकरी डॉ. नानासाहेब कसपटे यांचे सुपूत्र आहेत. त्यांनी गेल्या दशकभरात मधुबन ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून कृषीपूरक यंत्र, अवजारे विक्री क्षेत्रात उद्योजक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच एनएमके गोल्डन-१ या शेतकरी प्रिय सीताफळाची विक्री, संवर्धन व विकसन संशोधन या आघाडीवर ही ते कार्यरत आहेत. प्रविण कसपटे यांनी आजपर्यंत युरोप खंडात व दक्षिण आफ्रिका, चीन, जर्मनीसह १५ देशांचे अभ्यासदौरे केले आहेत.

यापुर्वी सिताफळातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचा राष्ट्रीय पातळीवरील ‘प्राईड ऑफ इंडिया- भास्कर पुरस्कार’ मिळाला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्काराने प्रवीण कसपटे यांचा गाैरव झाला आहे.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *