कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे: पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या बाप केकीने युरोप खंडातील सर्वात उंच शिखर असणारे माउंट एलब्रुज सर केले असून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अवघ्या वयाच्या १२ व्या वर्षी गिरीजा लांडगे आणि तिचे वडील धनाजी लांडगे यांनी माउंट एलब्रुजवर धाडसी आणि यशस्वी चढाई केली आहे. या शिखराची उंची ५ हजार ६४२ मीटर एवढी आहे.
युरोपातलं सर्वात उंच हिमशिखर सर करणारी महाराष्ट्रातील बाप-लेकीची जोडी
धनाजी लांडगे म्हणाले की, शिखरावर चढाई करणारी गिरीजा महाराष्ट्रातील व भारतातील पहिलीच मुलगी आहे. एकूण १० दिवसांच्या मोहिमेत आम्ही दोघांनी वातावरणाशी समतोल राखण्यासाठी २२ ते २५ तारखेपर्यंत ३१०० मीटर, ३८०० मीटर आणि मग ४८०० मीटर उंचीवर सराव केला. त्यानंतर, २६ तारखेला पहाटे तीन वाजता शिखर चढाईला सुरुवात केली, आणि सकाळी सात वाजता शिखर समिट सक्सेस केले. आम्ही १५ तासांत माउंट एल्ब्रुस पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजुने असणाऱ्या मार्गांनी समिट करण्याचा प्रयत्न केला. मात्र वातावरण खूपच खराब असल्याने दोन्ही बाजूने समिट यशस्वी झाला नाही. ५६४२ मीटर पश्चिम बाजूने समिट सक्सेस झाले. हे शिखर सर करणारी गिरिजा पहिली मुलगी असून पहिल्यांदाच बाप- लेकीच्या जोडीने ही कामगिरी केली आहे. या मोहिमेतून गिरिजाने ‘लेक वाचवा, लेक जगवा, लेक वाढवा ‘ हा संदेश दिला आहे. तिची ही मोहीम तिने सर्व मुलींना आणि आजोबांना समर्पित केली आहे.