महाराष्ट्रातल्या औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, वसई विरार या शहरांचा यामध्ये समावेश आहे.
केंद्राने दिलेल्या २२०० कोटींच्या निधीपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक ३९६.५ कोटींचा निधी-फडणवीस
कुतूहल न्यूज नेटवर्क
मोदी सरकारने जाहीर केलेल्या २२०० कोटींच्या निधीपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक ३९६.५ कोटींचा निधी मिळाला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी महाराष्ट्रातल्या कोणत्या भागाला किती निधी मिळाला त्याची यादीच ट्विट केली आहे. देशातल्या १५ राज्यांमधील शहरांमध्ये हवेचा दर्जा सुधारला आहे. हा निकष लक्षात घेऊन केंद्र सरकारने २२०० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. यातला महाराष्ट्राचा वाटा ३९६ कोटींचा असल्याचं फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमधून लक्षात आणून दिलं आहे.
औरंगाबाद – १६ कोटी
मुंबई -२४४ कोटी
नागपूर- ३३ कोटी
नाशिक २०.५ कोटी
पुणे- ६७ कोटी
वसई आणि विरार- १६ कोटी