कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: बार्शी-लातूर रस्त्यावरील ढेंबरेवाडी (ता. बार्शी) जवळील येडशी घाटाच्या नजीक डांबरी रस्त्यापासून उत्तरेला सुमारे अडीच किलोमीटर आतमध्ये जंगलात असलेल्या बेलखोरी शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
बेलखोरी शिवमंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी
या शिवमंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील पांगरी, ढेंबरेवाडी, चिंचोली, पांढरी, घोळवेवाडी, शिराळा, पाथरी, घारी, पुरीसह बार्शी येथील भाविकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. पांगरी येथील बेलखोरी बचतगटाच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद, केळी, दुधाचे वाटप करण्यात आले. मंदिरातील कार्यक्रम पार पाडण्यासाठी सोमनाथ नारायणकर, प्रकाश माळी, संजय काळे, रमेश मुळे, बालाजी पवार यांच्यासह बेलखोरी बचतगट व मित्रमंडळ पांगरी यांनी विशेष परिश्रम घेतले.