कुतूहल न्यूज नेटवर्क
मळेगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी
मळेगाव: मळेगाव ता बार्शी येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय मळेगाव येथे साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीराम निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
महात्मा फुले यांनी बहुजन समाज्यासाठी अनेक कार्य केली आहेत. ‘शेतकऱ्यांचाआसूड’ हा महात्मा फुले यांचा प्रसिध्द ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातीभेद अनिष्ठ प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्या काळच्या समाज्याला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. महात्मा फुले हे मराठी लेखक देखील होते. त्यांनी सत्यशोधक समाज या नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि अस्पृश्य व बहुजन समाज्याच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली.
यावेळी संजयकुमार माळी, नितीन पवार अमोल माळी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी सरपंच संजयकुमार माळी, उपसरपंच धीरज वाघ, गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, उद्दोजक शंकर विटकर, श्री शिवाजी तरुण मंडळाचे उपाध्यक्ष नितीन पवार, ग्रा.प.सदस्य समाधान पाडुळे, दशरथ इंगोले, सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, अमोल माळी, गिरीश माळी, यशवंत गाडे, लक्ष्मण सुरवसे, श्रीराम निंबाळकर, दत्तात्रय निंबाळकर, गणेश दळवी, किशोर वाघ, सुरेश कांबळे, आरोग्य कर्मचारी रुकुम अडगळे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अशोक माळी यांनी मानले.