fbpx

Mahindra Bolero Neo भारतात या तारखेला होणार लाँच, एवढी असू शकते किंमत

कुतूहल न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्राने काही दिवसांपूर्वीच आपली लोकप्रिय स्पोर्ट यूटिलिटी व्हेईकल (SUV) महिंद्रा बोलेरोच्या अपडेटेड व्हर्जनचा टीझर व्हिडिओ जारी केला होता. तेव्हापासून महिंद्राच्या या पॉवरफुल एसयूव्हीबाबत बरीच उत्सुकता होती. विशेष करून ग्रामीण भागात बोलेरोला अधिक पसंती आहे. १५ जुलैला दमदार नवीन बोलेरो (Mahindra Bolero Neo) भारतात लाँच करण्यात येणार आहे.

नवीन महिंद्रा बोलेरो येत्या १५ जुलै रोजी लाँच होणार असून कंपनीच्या डीलरशिप्समध्येही ही एसयूव्ही पोहोचण्यास सुरूवात झाली आहे. नवीन बोलेरो कंपनीच्या TUV300 वर आधारित असेल. हे वृत्त autocarindia ने दिले आहे.

Mahindra Bolero Neo चं इंजिन असे असेल
हे इंजिन 100 एचपी पॉवर आणि 240Nm टॉर्क जनरेट करेल. बीएस 6 कम्पलायंट 1.5 लीटर थ्री सिलेंडर इंजिन दिले जाऊ शकते. शिवाय या इंजिनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध असेल. टीयूवी-300 प्रमाणे फ्युअल सेविंग इंजिन स्टार्ट/स्टॉप टेक्नोलॉजीचा सपोर्टही देऊ शकते.

किंमत किती असू शकते
भारताच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये बोलेरोधिक पसंती आहे. लाँच झाल्यानंतर नवीन बोलेरोची किंमत (एक्स-शोरुम) ८.५ लाख ते ११ लाख रुपयांपर्यंत असू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *