आसिफ मुलाणी कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी : उस्मानाबाद तालुक्यातील कारी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, ज्वारी, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारी परिसरात द्राक्ष बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी महागडी औषधे रासायनिक खते वापरून द्राक्ष बागा या जतन केल्या आहेत आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले ज्वारी हरभरा गहू पिकाचे नुकसान झाले आहे,अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा यामुळे शेतातील पिके आडवी पडली आहेत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.