कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी तालुक्यातील नारी, सुर्डी, खांडवी, वैराग या मंडळातील नुकसान झालेल्या शेती क्षेत्राचे पंचनामे करा- खासदार ओमराजे निंबाळकर
सोलपूर: दि.२५ ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन सभागृह, सोलापूर येथे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर प्रामुख्याने उपस्थित राहून बार्शी विधानसभा मतदारसंघाती अनेक प्रश्न उपस्थित केले. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप बाबत नेहमीच हलगर्जीपणा करत असून त्यांनी तो हलगर्जीपणा बाजूला सारून आपल्या ठरलेल्या उद्दिष्ट प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज वाटप करावे. जर यानंतरही कोणती बँक पीक कर्ज वाटपात दिरंगाई करत असेल तर त्याबँकेवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. बार्शी तालुक्यातील पीक कर्ज उद्दिष्ट व वाटपाची आकडेवारी उपलब्ध करून द्यावी।
महावितरणचे बिल शेतकऱ्यांकडे थकीत आहे मान्य आहे परंतु सध्याच्या परिस्थितीत कोणत्या शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये खरीप उत्पन्न येईपर्यंत महावितरणने वसुलीला थोडीशी शिथिलता द्यावी.
तसेच सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबत, बार्शी विधानसभा मतदार संघातील १० महसूल मंडळापैकी ६ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी होऊन ४ महसूल मंडळे वगळलेली आहेत त्या वगळलेले ठिकाणचे नाल्या व नदीच्या बाजूची अनेक पिके व जमीन वाहून गेली आहे त्याचे देखील पंचनामे करावे संबंधितांना निर्देश द्यावेत.
MREGS अंतर्गत विविध भागांमध्ये विविध कामे करण्याबाबत जनजागृती करण्यास संबंधितांना सुचित करावे अशा विविध मागण्या संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पालकमंत्र्याना विनंती केली.
याबैठकीस सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी महाराज, बार्शीचे आ.राजेंद्र राऊत, जि.प.अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, आ.सुभाष (बापू) देशमुख, आ.संजय मामा शिंदे, आ.सचिन कल्याणशेट्टी, आ.शहाजी बापू पाटील, आ.समाधान आवताडे, आ. प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, सर्व जिल्हास्तरीय अधिकारी, सन्मानित सदस्य उपस्थित होते.