कुतूहल न्यूज नेटवर्क
मालवंडी येथील सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न
मालवंडी प्रतिनिधी : जगामध्ये सर्वश्रेष्ट आसतात ती आपली आई आणि वडील कारण त्यांचे सारखे जगात दुसरे दैवत कोणीच नाही म्हणून जन्म देणाऱ्या आई वडीलांना कधीच विसरू नका कारण त्यांच्या मुळेच आज आपण हे जग पाहत आहोत खरी भक्ती ही आपल्या माता पित्यांची करणे महत्वाचे आहे. आपण जसे वागाल तसे फळ मिळेल भक्ती करताना निस्वार्थ आसावी असे सांगुन आपल्या किर्तनातून ह.भ.प. विशाल खोले महाराज यांनी किर्तनाची सेवा बजावताना भक्तीमय संदेश दिला तसेच श्रीकृष्णाच्या विविध लीला उदहारणे पटवून दिल्या.
बार्शी तालुक्यातील मालवंडी येथील ग्रामदैवत श्री. शेका गौरीच्या पुण्यनगरीत सतऱ्याव्या अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे अयोजन करण्यात आले होते. यामध्ये दैनदीन कार्यक्रमात रोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण , गाथा भजन, महिलांचे भजन, हरीपाट, प्रवचन, किर्तन तसेच गावातील जयश्री उकरंडे, सिमा बारस्कर, सिमा खानुरे, रेखा होनराव ,जया गुरव, मंगल स्वामी या महिला भजनी मंडळानी भजनाची सेवा केली सलग सात दिवस विविध धार्मिक आणि भक्ती मय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
काल्याच्या दिवसी गावातून पालखी प्रदक्षीना वेळी लहान थोर भाविक टाळ मृदंगाच्या तालावर भगवी पथाका हाती घेऊन भक्तित तल्लीन होऊन पाउल खेळत होती. यावेळी गावातील महिलांनी डोक्यावर तुळस घेऊन पालखीबरोबर सहभागी होत्या कालचे किर्तने होऊन शेवटी लहान थोर भाविक भक्तानी महाप्रसाद घेतला. रात्री सुधाकर गवळी व जयश्री उंबरे यांचा भारूडाचा जंगी कार्यक्रम झाला. एकनात महाराज यांच्या भारुडामधून मानवी जीवनाचे महत्व सांगीतले. या सप्ताहसाठी व्यासपीट चालक ह.भ.प. प्रविण महाराज पंढरपूरकर, मृदांगाचार्य हरी चौरे, योगिराज कापसे, नवनाथ झुरुळे, शरद होनराव, बप्पा गुरव, महालिंग यादव, नागनाथ सरवदे, मोहन राजगुरु, चंद्रकांत होनराव, धर्मराज जाधव, संजय चव्हाण, अगंद कन्हैरे, आबु मुजावर, इसाक मुजावर, परमेश्वर सलगर, विश्वनाथ दहीवडकर, सचिन दहीवडकर, अशोक होनराव, अनिल जाधव , शरद जाधव, कुंडलिक काटे, गणेश परीट, अशोक परीट, संजय गुरव तसेच समस्त गावकऱ्यानी परीश्रम घेतले.