fbpx

मळेगाव ग्रामपंचायतवर ग्रामविकास आघाडीचा झेंडा

कुतूहल न्यूज नेटवर्क

मळेगाव : मळेगाव ता.बार्शी येथील ग्रामपंचायतवर नागनाथ महाराज नर्मदेश्वर ग्रामविकास आघाडीचा झेंडा फडकला.  संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मळेगाव ग्रामपंचायतचा निकाल लागला असून गेल्या 45 वर्षांपासून बिनविरोध राहिलेली ग्रामपंचायत म्हणून मळेगावची महाराष्ट्र राज्यामध्ये विशेष ओळख.

या ग्रामपंचायतच्या माध्यमातून गुणवंत मुंढे यांच्या कार्यकिर्दीत श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला अनेक पुरस्काराने राज्य शासनाने सन्मानित केले आहे,परंतु ह्या वर्षी गाव बिनविरोध करण्यासाठी अनेक मान्यवरांनी प्रयन्त केले, परंतु गाव बिनविरोध होऊ शकले नाही व गावची परंपरा खंडित झाली गावामध्ये दोन गटात निवडणूक लागली.

या निवडणुकीत गावाने नर्मदेश्वर नागनाथ महाराज ग्रामविकास आघाडीच्या पारड्यात आपली मते बहाल केली व सत्ता ताब्यात दिली, या निवडणुकीत ग्रामविकास आघाडीचे उमेदवार शंकर अशोक सुतकर, पुजा दशरथ इंगोले, सुजाता समाधान पाडुळे, जोती संजयकुमार माळी, शालन शब्बीर शेख, प्रकाश बाबुराव गडसिग, प्रल्हाद वसंत दळवी, तारा हरिश्चंद्र नलावडे, धीरज रमेश वाघ हे उमेदवार बहुमताने विजयी झाले.

विजयी उमेदवाराला श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी, अध्यक्ष अंकुश माळी, माजी सरपंच गुणवंत मुंढे, माजी सभापती गंगूताई माळी, माजी सरपंच संतोष निंबाळकर, मंडळाचे राजकुमार दळवी, उद्दोजक राजकुमार मुंबरे, प्रगतशील बागायतदार दिगंभर भराडे, श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे उपाध्यक्ष नितीन पवार,माजी उपसरपंच श्रीमंत गडसिग, माजी ग्रा.प.सदस्य श्रीमंत पाडुळे, यशोदीप सामाजिक शिक्षण संस्थापक रशीद कोतवाल, यशदाचे शिवाजी पवार, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गाभने, उद्दोजक सागर माळी, माजी ग्रा.प.सदस्य विजयकुमार श्रीखंडे, संदीप विटकर, शंकर विटकर, सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, अविनाश इंगोले, दीपक निंबाळकर, गिरीश माळी, शांतकुमार पाडुळे, यशवंत गाडे आदींनी अभिनंदन करून विजयी उमेदवाराला गावच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *