fbpx

मळेगावकरांनी घडविले माणुसकीचे दर्शन, व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून रुग्णाला केली मदत

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील श्री शिवाजी तरुण मंडळ या ग्रुप च्या माध्यमातून दशरथ लाडे यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करत माणुसकीचे दर्शन घडविले. गावातील दशरथ लाडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना लातूर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तिथे त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही, म्हणून त्यांच्या कुटूंबियांना व नातेवाईकांनी त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला व काही दिवसांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यास सुरुवात झाली व कुटूंबियांना धीर आला. परंतु हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उपचारासाठी पाच ते सहा लाख रुपये खर्च होईल असे सांगितले. त्यामुळे आपल्याला खर्च पेलायचा कसा असा प्रश्न पडल्यानंतर लाडे कुटूंबियावर आर्थिक डोंगर कोसळला. पेशंटच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली परंतु डॉक्टरांनी त्यांना काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यास सांगितले.

गेल्या एक ते दीड महिन्यापासून हा पेशंट सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे असे गावामध्ये काळाल्यानंतर गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांना थोडी मदत करण्याचा निर्णय घेवून लक्ष्मी पूजना दिवशी हा मदतीचा मेसेज श्री शिवाजी तरुण मंडळ या व्हॉट्स ॲप ग्रुपवर टाकला हा मेसेज ग्रुपवरील सदस्यांनी वाचला व कुठल्याही क्षणाची वाट न बघता आपआपल्या परीने मद्दत देण्यास सुरुवात केली. दोन दिवसांमध्ये चौवेचाळीस हजार दोनशे रुपये जमा झाले. या आधी देखील याच ग्रुपच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मद्दत केली आहे. गावाने देखील या व्हॉट्स अँप ग्रुपचे कौतुक केले आहे. हा ग्रुप बाळासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.

दोन दिवसांमध्ये जमा झालेली रक्कम लाडे कटुबियाना श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर शेख, माजी उपसरपंच श्रीमंत गडसिग, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष संतोष गाभने, मंडळाचे मार्गदर्शक आदम बागवान, बाबुराव बाबर, विजय श्रीखंडे, सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, ग्रा.प.सदस्य दशरथ इंगोले, मंडळाचे किशोर वाघ, ग्रामपंचायत क्लार्क सुरेश कांबळे आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता.  100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *