कुतूहल न्यूज नेटवर्क
अतिसंवेदनशील मालवंडी ग्रामपंचायत झाली बिनविरोध, ग्रामस्थांच्या प्रयत्नाला यश
बार्शी: बार्शी तालुक्यातील दक्षिण भागातील राजकीय वर्तुळामध्ये नावाजलेले आणि अतिसंवेदनशील असलेल्या मालवंडी गावचे निवडणूक मात्र बिनविरोध करण्याचे गावकऱ्यांनी ठरवले होते त्यांच्या परिश्रमाला यश आले आहे 1950 ला ग्रामपंचायत स्थापन झाली 1950 ते 2000 पर्यंत 50 वर्ष ग्रामपंचायत बिनविरोध केली जात होती.
परंतु पन्नास वर्षाची बिनविरोधची परंपरा 2005 च्या निवडणुकीत खंडित झाली होती यामध्ये सोपल गट आणि राऊत गट या गटामध्ये निवडणुका होत होत्या आता पुन्हा बिनविरोध करण्याचे गावातील दोन्ही पार्टीच्या नेत्यांनी ठरवले होते राजकारणात मालवंडी ग्रामपंचायत राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते मालवंडी जिल्हा परिषद गट आहे गावात प्रभाग चार असून अकरा सदस्य संख्या आहे जवळपास तीन हजार मतदार संख्या आहे.
गावचे ग्रामदैवत श्री शेखा गौरी मंदिरांमध्ये सर्व गावकरी एकत्र येऊन जुने जाणकार मंडळी दोन्ही पार्टीचे नेते तरुण मंडळी यांनी ठरवले की गावातील भांडण-तंटा गट तट मतभेद सर्व काही सोडून सर्व गाव एकत्रित येऊन गावाचा विकास कसा होईल यासाठी सर्व गाव एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे ठरवले होते.
11 सदस्यांनी फॉर्म भरायचे असा गावाचा एकमुखी ठराव झाला असता तरीही 26 लोकांनी फॉर्म भरले होते त्यातील 15 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. यावेळी गावचे ग्रामदैवत श्री शेखा गौरी मंदिरात जाऊन सर्व ग्रामस्थांनी देवाचे दर्शन घेऊन गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
ठेवलेले अर्ज – मंदाकिनी कावरे, रामलिंग घेवारे, पूजा नरुटे, नवनाथ गवळी ,सैनाभी मुजावर, संध्या होनराव, हनुमंत होनमाने, अनिता खंडागळे , लहु काटे ,विष्णू चव्हाण, अरुणा कुलकर्णी.
उमेदवारी अर्ज मागे घेतलेली नावे- सागर बिडकर, योगिता बिडकर, अनिल गावसाने ,रामचंद्र माळी ,हनुमंत कानडे, सोमनाथ थोरात ,उत्तम थोरात, मनीषा थोरात, पुनम थोरात ,पुष्पा कावरे, कमल राजगुरू.
यावेळी राजेंद्र सरवदे विक्रीकर उपआयुक्त, रामभाऊ थोरात सेवानिवृत्त डी वाय एस पी, श्रीमंत थोरात जिल्हा परिषद सदस्य, बाबासाहेब काटे पंचायत समिती सदस्य, धन्यकुमार साखरे, संतनाथ खंडागळे, पिंटू पाडूळे, सोमनाथ थोरात, ममशाद मुजावर, वामन काटे, दादा खंडागळे, विष्णू साखरे, पांडुरंग सलगर, सुनील सलगर, अनिल पाटिल, अशोक काटे विश्वनाथ दहीडकर यानी तसेच ग्रामस्थांनी गाव बिनविरोध करण्यासाठी परिश्रम घेतले.