fbpx

मराठा मंत्र्यांना फक्त आपली पदे टिकवायची आहेत त्यांना आरक्षणात रस नाही – नारायण राणे

कुतूहल न्यूज नेटवर्क

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा रद्द केल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापू लागले होते. आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना निवदेन सादर केलं होतं. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कायदा जर ‘फुलप्रूफ’ तर सर्वोच्च न्यायालयात का टिकला नाही असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता.

आता याच मुद्द्यवरून भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारमधील मराठा समाजाच्या नेत्यांना टोला लगावला आहे. मराठा मंत्र्यांना फक्त आपली मंत्रीपदे टिकवायची आहेत, त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणात काहीच रस नाही,’ अशा शब्दात खासदार राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते आज मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. राज्यातील हे महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीची आपली जबाबदारी झटकत आहे. वास्तविक पाहता या सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकताच नसल्याचे दिसते. राज्य सरकारने विरोधकांना एकत्र घेऊन बसलं पाहिजे. त्यांच्यासमवेत चर्चा करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणीही यावेळी राणेंनी केली.

यावेळी राणे म्हणाले कि, ‘ मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. तरी देखील राज्य सरकार राज्यपाल व पंतप्रधानांना पत्र लिहीत आहे. तसेच राज्यपालांना पत्र लिहीत आहे. या पत्रांची रस्कारकडून का घाई केली जात आहे.? याचा खुलासा त्यांनी करावा. राज्यपालांना पत्र देण्याअगोदर जर सर्व संघटना, विरोधी पक्षनेते यांच्याबरोबर चर्चा केली असती तर बरे झाले असते. या सरकारच्या अशा पद्धतीच्या प्रकाराकडे पाहता आता मराठा समाजातील सर्व संघटनांनी एकत्र यावं, असे आवाहनही यावेळी राणेंनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *