कुतूहल न्यूज नेटवर्क: दयानंद गौडगांव
आकुर्डी येथे अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाची सभा संपन्न
पिंपरी-चिंचवड : आकुर्डी येथे अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाची सभा संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर घालण्यात आलेल्या नियम व अटी लक्षात घेता मोजक्याच पदाधिकारी व पत्रकारांच्या उपस्थितीत हि सभा आयोजित करण्यात आली होती . या सभेचे आयोजन अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेश कनकुरे यांनी केले होते.
यावेळी संघासाठी काम करण्यास इच्छुक असलेल्या काही नवीन सदस्यांना संघाचे ओळखपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा जनलोक वार्ताचे मुख्य संपादक राजू शिंगाडे यांनी , नव्याने रजिस्ट्रेशन झालेल्या जनलोक वार्ता या साप्ताहिक वृत्तपत्र प्रकाशनाबात सविस्तर माहिती दिली. व त्यासाठी नेमण्यात आलेल्या १७ जणांच्या समितीबाबत सविस्तर माहिती दिली .ते पुढे म्हणाले,”आपण पत्रकार आहोत, आपल्याकडे पाॅवर आहे, त्यामुळे न घाबरता न डगमगता अन्यायाविरुद्ध आवाज उठवा आणि अवैध धंद्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न करा” असे धैर्य पत्रकारांना दिले. तसेच पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्यांचे निवारण करण्यात आले.
या सभेस अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासमावेत नईम मेहदी, इस्माईल तांबोळी, मुस्तफा चाबरू , महेश पानसकर, चंद्रकांत सलवदे, धर्मपाल कांबळे, शिवा फुलारी, सतीश वाघमारे , राजू मखरे ,दयानंद गौडगांव आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.