कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: आगळगाव ता.बार्शी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण नियामक समिती व कार्यकारी समितीची सभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य किरण मोरे होते. माजी उपसभापती अविनाश मांजरे, पं.स.सदस्य रेणुका बारंगुळे, सरपंच पुतळा गरड, सरपंच पपु टेकाळे, श्रीधर कदम आदी उपस्थित होते.
आगळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीची बैठक
बैठकीत २०२०-२१ मध्ये झालेल्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच चालू आर्थिक वर्षात करावयाच्या कामाबद्दल चर्चा होऊन त्याचे नियोजन करण्यात आले.
याचबरोबर कल्याण समितीअंतर्गत आरकेएस निधीमधून कनिष्ठ सहाय्यक यांना मासिक रू १५०० मानधन न देता सदरील निधी रुग्ण कल्याण समिती अंतर्गत अवश्यक वैद्यकीय बाबी साठी खर्च करण्यात यावा याबाबत सर्वानुमते ठराव घेण्यात आला. व त्यास मान्यता देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र आगळगाव येथील कामकाजाचा आढावा घेण्यात आला व कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोनाकाळातील कामाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे, वैद्यकीय अधिकारी समीर उकरंडे आदी उपस्थित हजर होते.