कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ मनोज गादेकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन शनिवारी (दि. ७) सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ मनोज गादेकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए.डी. सुर्वे उपस्थित होते.
बार्शीतील झाडबुके महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार

महाविद्यालयातून विज्ञान शाखा यादव सत्यजित विलास (९७.१७%), कला शाखेतून पाटील गुरुनाथ दादासाहेब (९२.५० %) तर एमसीव्हिसी विभागातून मिरगणे प्रकाश विजय (७७%) यांनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गादेकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी न राहता खऱ्या अर्थाने विद्यार्थी व्हावे, सामाजिक बांधिलकी जपावी मुल्ये आणि संस्कार जपावे . तर उपप्राचार्य यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना कोरोना महामारीमुळे कशा विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागले हे सांगितले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे आणि शिक्षकांचे या यशामध्ये खूप मोठे योगदान आहे असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक, सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र गाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता प्रा अनिल गेळे यांनी वंदेमातरम गाऊन केली. सूत्रसंचालन प्रा मंगेश कांबळे, प्रा संदीप उबाळे तर आभार प्रा .एस. बी रणदिवे यांनी मानले.