कुतूहल न्यूज नेटवर्क
पांढरी येथे युवा प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
पांगरी दि. 23 : आज पांढरी ता. बार्शी येथे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार युवा प्रतिष्ठानच्या वतीने ट्रॉफी, प्रमाणपत्र, रोख रक्कम व पुस्तक भेट देवून करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष देविदास घावटे व प्रमुख पाहुणे पोलीस उप निरीक्षक प्रवीण सिरसाट होते.यावेळी प्रवीण सिरसाट यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा सदुपयोग कसा करावा व आपले ध्येय कसे साध्य करावे याबाबत मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम 2014 पासून सुरू आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाल्या आहेत.

यावेळी सरकारी वकील श्रीधर जावळे,उपसरपंच राजू घावटे, पत्रकार इरशाद शेख ,महेश घावटे ,अच्युत घावटे , दत्ता घावटे,प्रशांत घावटे,हनुमंत घावटे व आदीं मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मण घावटे यांनी तर आभार प्रदर्शन गणेश घावटे यांनी केले.