आसिफ मुलाणी: कुतूहल न्यूज नेटवर्क
श्री शिवाजी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार
कारी : यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित कारी ता. जि. उस्मानाबाद येथील श्री शिवाजी विद्यालयात रामविजय अशोक जाधव याची भारतीय सैन्य दलात तर आदित्य प्रमोद करळे याची माध्यमिक शिष्यवृत्ती साठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक शामराव जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद करळे होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एस. भुसारे यांनी केले. यावेळी ते म्हणाले भारतीय सैन्य सीमेवर डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या देशाचे रक्षण करतात त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो.
आपल्यापैकी प्रत्येकानेच देशसेवेसाठी भारतीय सैन्यामध्ये भरती व्हावे. आगलावे आर.सी, सत्कार मूर्ती रामविजय जाधव, आदित्य करळे यांनी मनोगत व्यक्त केली. स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे लोहार सर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या वेळी एल. एम. ढेंबरे, ए. आर.जाधव, एन.आर. चव्हाण, एस.एम .मनगिरे, आय. एम.शेख, व्ही.बी गायकवाड, भोसले मॅडम , ताटे मॅडम, आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन ए.एम. जोशी यांनी तर आभार डी. टी. सोनवणे, यांनी मानले.