fbpx

पंढरपूरातील संचारबंदीचा कालावधी कमी करा! आमदार आवताडे व परिचारक यांची मागणी

कुतूहल न्यूज नेटवर्क 
पंढरपूर : विजयकुमार मोटे 

शनिवार दि. १ ० जुलै रोजी पंढरपूर येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारी २०२१ आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार समाधान आवताडे व आमदार प्रशांत परिचारक यांनी वारी कालावधीतील पंढरपूर येथील संचार बंदीचा कालावधी कमी करण्याची मागणी केली आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर मध्ये १७ जुलै ते २५ जुलै दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी जवळ जवळ ८ दिवसाची आहे. त्यामुळे वारीमध्ये येणाऱ्या ३०० वारकऱ्यांसाठी पंढरपूर मधील दोन -तीन लाख लोकांना वेठीस धरले जाणार आहे. अशी प्रतिक्रिया आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर येथील आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

तसेच आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की, याबाबत आमदार प्रशांत परिचारक व मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेटलो परंतु त्यांच्या कडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये यावर काहीतरी मार्ग निघेल असे वाटत होते परंतु तो मार्ग दिसला नाही. आजच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी व एसपी यांनी मिळून मार्ग काढायचे ठरले आहे असेही त्यांनी सांगितले.

आणखी थोडे दिवस आहेत यावर नाही मार्ग निघाला तर पुढचा निर्णय घेऊ असेही प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *