कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: तालुक्याच्या कृषी विभागाचे सर्व अधिकारी व खत विक्रेते यांच्यासोबत आमदार राजेंद्र राऊत यांनी सन २०२१ – २२ या शेतीच्या खरीप हंगाम पूर्वची आढावा बैठक बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतली.
खरीप हंगामासाठी बि-बियाणे, खते कमी पडू नये, आमदार राऊत यांची आढावा बैठक
या बैठकीत तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र, त्याचप्रमाणे खरीप हंगामाच्या लागवडी लायकचे एकूण क्षेत्र, खरीप सरासरी क्षेत्र, भाजीपाला, फळबागा लागवडीचे क्षेत्र, एकूण खातेदार व खरीप गावांची संख्या, सन २०२०-२१ यामध्ये झालेला सरासरी पाऊस या सर्व गोष्टींची माहिती घेऊन, सध्यस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.
कृषी विभागाने खरीप हंगामासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती बि-बियाणे, खते व कीटकनाशके यांची उपलब्धता करावी, जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय होता कामा नये, अशा सूचना दिल्या. या बैठकीत सोयाबीन, तूर, नविन लाल तूर, उडीद व कांद्याची लागवड याबाबतही प्रमुख्याने चर्चा करण्यात आली.
या आढावा बैठकीस पंचायत समितीचे सभापती अनिल काका डिसले, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, मंडळ कृषी अधिकारी दिलीप राऊत, कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, कृषी पर्यवेक्षक गणेश पाटील, बाळासाहेब चापले, विलास मिस्कीन, सुधीर काशीद, भारत दाईंगडे, खत विक्रेते राहुल मुंढे, उमेश चव्हाण, बप्पा कोकाटे, नाना मते आदी उपस्थित होते.