fbpx

युवकांमध्ये वाढतोय आमदार सचिन कल्याणशेट्टींचे क्रेझ

दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क

अक्कलकोट प्रतिनिधी : अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची युवकांमधील लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यात आतापर्यंतच्या सर्वात जास्त मताधिक्याने सचिन कल्याणशेट्टी निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या फॅन्स फाॅलोइंगच्या संख्येत आखणीन भर पडली आहे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी हे आज नाविंदगी येथे एका लग्न कार्यास गेले होते. त्यात ही प्रचिती आली. त्यांना पहायला आणि त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी युवकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमात आमदार सचिन कल्याणशेट्टींचे चाहते सुध्दा झपाट्याने वाढताना दिसत आहेत. कोणताही जात धर्म भेदभाव न करता कोणाच्याही हाकेला किंवा आमंत्रणाला प्रतिसाद देत आमदार आवर्जून हजर असतात आणि त्यांचा हसरा चेहरा,सर्वांशी मनमिळाऊ स्वभावही तितकेच खरे आहे. त्यामुळेच अगदी चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत त्यांचे चाहते आहेत असे म्हणायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *