fbpx

मोहोळ- दुचाकी चोरांच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या, ६ दुचाकी जप्त

कुतूहल न्यूज नेटवर्क

मोहोळ : दुचाकी चोरी करणाऱ्या चोरांच्या मुसक्या मोहोळ पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्याकडून एकूण ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (mohol- Two-wheeler thieves caught by police, 6 bikes confiscated)

कुरुल रोडवरील बंद पडलेल्या टोल नाका येथे एक इसम चोरीची गाडी घेवून थांबला आहे. अशी बातमी मिळाल्याने पोलीस त्या ठिकाणी गेले असता बातमीप्रमाणे संशयीत इसम थांबलेला दिसला त्यांचेजवळील मोटारसायकल बाबत चौकशी केली असता त्यांने ती चोरून आणल्याचे समजले. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांने कुरूल येथे लावलेल्या एकुण ०५ मोटारसायकली दाखवल्या.

मोहोळ पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हयातील २ मोटारसायकल मिळून आल्या. तसेच इतर बजाज कंपनीची प्लॅटीना काळ्या रंगाची तिचा चेसी नंबर MD2A76AYJWF12708, हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स काळया रंगाची MH-13 BJ – 3856, होडा कंपनीची शाईन काळ्या रंगाची तिचा चेसी नंबर ME4JC366E98265084, होडा कंपनीची शाईन काळ्या रंगाची तिचा चेसी नंबर ME4JC36PLE7067763 असे एकूण ०६ मोटारसायकली आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांचे नेतृत्वाखाली मोहोळ पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकातील सपोफौ शिंदे, पोकॉ/ साठे, पोकॉ/ थोरात, पोकॉ/ दळवी यांनी सदरची कामगिरी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *