राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज झापटीने वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहे. त्यात काळ सुद्धा राज्यात कोरोना बडितांचा आकडा वाढलेला दिसून आला आहे. मागील २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येने लक्षणीय वाढ आहे. राज्यात ६२ हजार ९७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.
यातही दिलासादायक बाब म्हणजे आज ५४ हजार २२४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३२ लाख १३ हजार ४६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.राज्यात एकूण ६ लाख ८३ हजार ८५६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.14 टक्के झाले आहे. दरम्यान, आज 519 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर १.५५ एवढा झाला आहे.
दरम्यान, राज्यात वाढत्या रुग्णसंख्याच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. पुढील १५ दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत माहिती देतील. काही वेळात लॉकडाऊन बाबतच्या गाईडलाईन्स जारी होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनवर एकमत झाले आहे.