fbpx

आई ने पोटच्या मुलीला पेन्सिलने भोसकलं आणि घेतलेत चावे

कुतूहल न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. मुंबईतील एका आईवर आपल्याच मुलीला पेन्सिलने भोसकल्याच्या आरोपावरून केस दाखल करण्यात आली आहे.आपली मुलगी ऑनलाईन वर्गामध्ये दुर्लक्ष करत असल्याने या आईने मुलीला पेन्सिलीने भोसकल्याचा तिच्यावर आरोप करण्यात येतोय. 

सध्या अनलॉक होत असलं तरीही शाळा सुरु झालेल्या नाहीत. अशात विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गांच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातंय. असेच ऑनलाईन वर्ग सुरु असताना शिक्षिकेने सदर १२ वर्षीय मुलीला एक प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देता न आल्याने तिच्याच आईने तिला पेन्सिलने भोसकल्याची तक्रार सांताक्रूझ पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

सदर घटना दि.21 बुधवारी घडलीये. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन वर्ग सुरु होता. वर्गातील शिक्षिकेने या मुलीला काही प्रश्न विचारलेत, मात्र मुलीला त्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत. आपल्या मुलीला उत्तरं देता येत नाहीयेत पाहून तिच्या आईला प्रचंड राग आला. त्यानंतर या क्रूर आईने तिच्या मुलीच्या पाठीवर पेन्सिलने भोसकलं आणि तिचे चावे देखील घेतले. या सर्व घटनेला साक्षी असणाऱ्या तिच्या लहान बहिणीने चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 वर फोन करून घडलेला सारा प्रकार सांगितला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *