कुतूहल न्यूज नेटवर्क
चिखर्डे येथे ऊसाच्या ट्राॅलीला धडकून दुचाकीस्वार मृत्युमुखी
बार्शी : ऊस घेऊन जाणाऱ्या व रस्त्यावर मधोमध उभ्या असलेल्या ट्रॅक्टर एमएच २५ एएल ९७१४ व एमएच २५ एएल ६६६३ ट्रॅक्टर ट्राॅलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारादम्यान मृत्यु झाल्याचा प्रकार बार्शी-उस्मानाबाद मार्गवर चिखर्डे शिवारातील हाॅटेल किंग कॉर्नर जवळ घडला.
दशरथ त्रिबंक शिंदे वय ४९ रा.बार्शी असे दुचाकी अपघातात मृत्यु मुखी पडलेल्याचे नाव आहे.रोहन अनिल कोंढारे रा चिखर्डे ता बार्शी असे अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
लखन वैजिनाथ शिंदे , वय २९ रा नारी, ता बार्शी यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे चुलचे दशरथ त्रिबंक शिंदे हे बार्शी येथे त्यांचे कुटुंबासह राहत होते त्यांची शेती ते करतात. सायंकाळी ०७/०० वा चे सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र अनिल बारंगुळे व चुलते दशरथ शिंदे असे तिघे जण बार्शीला शेतामध्ये फवारणीची औषध आणने करिता नारी येथुन बार्शी कडे निघाले होते. ते व अनिल बारंगुळे असे दोघेजण एका मोटार सायकल वर व चुलते दुसरे मोटार सायकलवर असे जात असताना उस्मानाबाद बार्शी रोडने चिखर्डे गावचे पुढे किंग कॉर्नर हॉटेल जवळ आलो असता चुलते पुढे होते त्यावेळेस चुलत्यांची मोटासायकल रस्त्यावर मध्यभागी उभे असलेल्या ऊसाच्या ट्रायलीला पाठीमागुन धडकले. ट्रॅक्टरची ट्रॉली ही रस्त्याचे मध्यभागी उभे असून सुद्धा ट्रॅक्टर चालकाने ट्रॉलीस कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर लावलेले नव्हते व ट्रॉली उभे असलेले बाबतचे कोणतेही पार्कीग लावलेली नव्हती.अधिक तपास हवालदार सतिश कोठावळे हे करत आहेत.