कुतूहल न्युज नेटवर्क
बार्शी तहसिलसमोर बोंबाबोंब आंदोलन….तर पिकवीमा कंपनीच्या राज्याच्या प्रमुखांची धिंड काढणार – शंकर गायकवाड
बार्शी: चालू वर्षीची अतिवृष्टीची व सर्वच पिकांना १००% पिकवीमा भरपाई द्या, सन २०१८-१९चा मागील राहिलेला दुष्काळ निधी द्या, लॉकडाऊन काळातील घरगुती व कृषी विजबीलातुन मुक्तता द्या, सर्वच खातेदारांना प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ द्या आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
दहा दिवसाच्या आत जर सर्वच शेतकऱ्यांना पिकवीमा भरपाई न मिळाल्यास पिकवीमा कंपनीच्या प्रमुखांची टक्कल करून धिंड काढणार असल्याचा इशाराही शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला. यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार संजीवन मुंढे यांनी स्विकारले तर बार्शी शहर पोलीसांनी आंदोलनाचा चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
त्यावेळी शरद भालेकर, सचिन आगलावे, समाधान भालेकर, भगवान निर्मळ, बाळू उंबरे, भोलेनाथ उंबरे, भालचंद्र आगलावे, नामदेव आगलावे, अर्जून उंबरे, मोहन ननवरे, हनुमंत फोपले, अनुरथ आगलावे, सचिन पाटील, नागनाथ पवार, बाळू पवार, कुमार फोपले, अशोक आगलावे, बाबासाहेब आगलावे, पिंटू लोखंडे, पप्पू शेख, विनोद उंबरे, आकाश उंबरे, दत्तात्रय पाटील, कृष्णा घावटे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.