fbpx

विनामास्क रँपवाॅक व सुरक्षित अंतराचा फज्जा उडविणाऱ्या महापौरांवर कारवाई करा – खा. डॉ. अमोल कोल्हे

कुतूहल न्यूज नेटवर्क

चिंचवड (दयानंद गौडगांव) : राज्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा झपाट्याने वाढत आहे. खबरदारीचे उपाय म्हणून सर्व सामाजिक कार्यक्रमांवर प्रशासनाकडून बंदी घालण्यात येत आहे. असे असताना पिंपरी-चिंचवड भाजपच्या महापौर उषा ढोरे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ‘फॅशन शो’ आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला. या कार्यक्रमात सुरक्षित अंतर, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अनेकांनी मास्कचा वापर केले नसल्याचे दिसून आले. कोरोनाचे नियम मोडल्यावर प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेवर कारवाई होते. तशीच कारवाई महापौरांवरही व्हायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध जाहिर केले. मुख्यमंत्र्यांनीही त्याच दिवशी सायंकाळी सोशल माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या भाजपच्या महापौर ढोरे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाकडे सपशेल दुर्लक्ष करत ‘फॅशन शो’ आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला. हे अतिशय खेदजनक आहे”. असेही खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *