कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
कळंब तालुक्यातील मलकापूर, शेलगाव, संचितपूर, सापनाई आदी गावामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची, पडझड झालेल्या घरांची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना नुकसानीची ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर सातत्याने प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिली. खासदार निंबाळकर यांनी मलकापूर येथील तुळशीदास नरसिंग चंदनशिवे यांच्या घराचे पावसामुळे नुकसान झाल्याने घराची पाहणी करत अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची खासदार निंबाळकरांनी केली पाहणी
यावेळी आमदार कैलास घाडगे पाटील, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, गटविकास अधिकारी चकोर, तालुका कृषी अधिकारी जाधव, शेलगाव ज. चे माजी सरपंच बाबुराव तवले, सरपंच विनोद तवले, दहिफळचे सरपंच चरणेश्वर पाटील, लोमटे गुरुजी, समाधान बाराते, अशोक हावळे, वसंत धोंगडे यांच्यासह संबंधित गावांचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच – उपसरपंच यांच्यासह शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount