fbpx

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली पूरग्रस्त भागातील गावाची पाहणी

कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद: आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा, लासोना, सांगवी गावासह समुद्रवाणी, घुगी, पाडोळी (आ) गावात शुक्रवारी रात्रीच्या सततच्या मुसळधार पावसामुळे समुद्रवाणी गावालगत असलेल्या ओढ्याला पूर आल्याने इंडिका कारसह दोन व्यक्ती वाहून गेले होते. त्यातील मेंढा येथिल गोवर्धन विष्णू ढोरमारे व बाबा विश्वनाथ कांबळे हे गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुखरूप बाहेर निघाले आहेत. बबन भगवान रसाळ रा लासोना (वय ४०) यांचा शोध गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस, महसूल, नगरपरिषद आणि उस्मानाबाद फायर ब्रिगेडची टीम करत आहे. चालू असलेल्या शोध मोहिमेची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर शोध घेण्याच्या सुचना केल्या.

पावसाचे पाणी गावात शिरल्याने घरांची पडझड झाली तसेच नुकतीच पेरणी केलेली पिके व जमिनी मोठ्या प्रमाणात वाहून गेली असून तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. काही ठिकाणी रस्त्यांना नाली नसल्यामुळे रस्त्यांचे नुकसान झाले अशा आवश्यक ठिकाणी पाणी काढून देण्यात यावे व रस्त्यांचे सर्व्हे करण्याचे निर्देशही निंबाळकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

याप्रसंगी शिवसेना आ. कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख, जि.प.सदस्य सक्षणा सलगर, रवी कोरे आळणीकर, तहसीलदार गणेश माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, तालुका कृषी अधिकारी डि.आर.जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षकशेंडगे, गोरे, कामेगाव सरपंच गोविंद कदम, सुमद्रवाणीचे सरपंच शिवाजी पसारे, ग्रा.पं.सदस्य पांडुरंग कदम, लासोना सरपंच स्वामी, पाडोळीचे ग्रा.पं.सदस्य सतिश एकंडे, अशोक शिंदे, राजेश सुतार, भारत काटे, निळकंठ कोपणवार, अमोल माने आदी संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *