कुतूहल न्यूज नेटवर्क
खासदार ओमराजे निंबाळकर यांची उक्कडगावला भेट
बार्शी : बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या गावास भेट देऊन आवश्यक त्या केलेल्या उपायोजनाची पाहणी केली.अधिकाऱ्यासमवेत सद्य स्थितीचा आढावा घेतला.तसेच गावासाठी अर्सेनिक अल्बम 30 च्या 500 गोळ्याच्या डब्या पाठविले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी शेखर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जोगदंड,वैद्यकीय अधिकारी डॉ.ढगे, सरपंच विक्रम जाधवर, तलाठी विनोद मुंढे, पोलीस पाटील नितीन वाघमारे,
ग्रामसेवक गोपाळ घुगे,कृषी सहायक फड, पांडुरंग मुंढे,श्रीमंत मुंढे,नवनाथ मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते.