कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी विधानसभा मतदार संघातील घोळवेवाडी, चिंचोली, ढेंबरेवाडी, पांढरी, पांगरी, शिराळे, पिंपळवाडी, वालवड, चारे, पाथरी, घारी गावांस खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट देऊन गावांतील विकास कामासंदर्भात व नागरिकांच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली.
खा. ओमराजे निंबाळकर यांची बार्शी तालुक्यातील गावांना भेट; जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या अडचणी
गावातील मंदिरांना तीर्थक्षेत्रात मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव द्यावेत मंजूर होतील. तसेच गावात विविध योजनांबाबत जनजागृती करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. गावात वैयक्तिक लाभार्थींसाठी ज्या योजना आहेत या योजनेच्या कर्मचाऱ्यांनी आणि गावातील नागरिकांनी गावांच्या विकासात हातभार लावावा. विविध योजनांबाबत जनजागृती करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MREGS) अंतर्गत विहिर, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, बांधावर/शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करावी. संबंधित अधिकाऱ्यांनी योजनांच्या माहिती पुस्तीका गावामध्ये वितरण करावी.
पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या मार्फ़त चालू असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत दर्जा ढासळू देऊ नये आणि जर दर्जा ढासळला तर कंत्राटदारांना नोटीस काढावी. तसेच जलसंधारण विभागामार्फत सुरू असणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत तडजोड चालणार नाही कामाचा दर्जा उच्च असावा. असे निर्देश दिले.
निवडणुकीपुरते राजकारण सोडून निवडणुका संपल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी गावाच्या विकासासाठी एकत्रित यावे. गावातील अंतर्गत वाद बाजूला सारून गावच्या विकासासाठी आणि कामाच्या दर्जाबाबत सर्वांनी लक्ष द्यावे. अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरीत्या गावातील प्रत्येक रखडलेल्या कामामध्ये लक्ष घालावे. गावातील विविध रखडलेल्या शेत रस्त्यांबाबत आणि पाणंद रस्त्यांबाबत आणि साठवण तलाव ते गाव या जोडणाऱ्या रस्त्याबाबत गटविकास अधिकारी तहसीलदार यांनी एकत्रितपणे मार्ग काढावा.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण काकडे, जिल्हा परिषद सदस्य रेखा राऊत, उपतालुका प्रमुख आबा गपाट, उपतालुका प्रमुख राजाभाऊ पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी शेखर सावंत, तालुका आरोग्य अधिकारी अशोक ढगे, जि.प. बांधकाम विभाग शाखा अभियंता आयुब शेख, वीज वितरणाचे सहाय्यक अभियंता प्रदीप करपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सचिन वासकर, गावचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी, गावातील जेष्ठ नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount