fbpx

MP Rajeev Satav Death: काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन

कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे प्रतिनिधी: काँग्रेसचे नेते, राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या 23 दिवसापासून व्हेंटिलेटरवर होते. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झालं. राजीव सातव यांची कारकीर्द गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. चार वेळा सातव यांना संसद रत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 2014 मध्ये हिंगोलीतून खासदार पदी निवड फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 पर्यंत भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलं. काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक. सातव यांच्या नेतृत्वात 2017 गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात प्रभारी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. गेल्यावर्षी राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून खासदारकी.

काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनानं महाराष्ट्रानं, देशानं एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे.त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सोहार्दाचे संबंध होते. ते भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. भावपूर्ण श्रद्धांजली! अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो! देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *