fbpx

महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेतले पायऱ्यावर बसवून

लेखी स्वरूपात लिहून दिल्याशिवाय अधिकाऱ्यांना जाऊ देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील भानसगाव येथे रात्रीच्या वेळी असलेला शेतीसाठी वीज पुरवठा, दोन दोन दिवस वीजपुरवठा खंडित, आठ तास सुरळीत वीजपुरवठा होत नाही. अशा विविध समस्यांना कंटाळून गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पायऱ्यावरती महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी बसवून घेतले.

जोपर्यंत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन लेखी स्वरूपात देत नाहीत तोपर्यंत आम्ही महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाऊ देणार नाही असा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.

जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, सोनेगावचे उपसरपंच प्रमोद पवार, कारी गावचे माजी सरपंच इम्रान मुलाणी, पंडित जगदाळे यांच्यासह सोनेगाव व भानसगाव येथील शेतकरी उपस्थित होते.

प्रत्येक दिवसाला एक दिवस आड करून चार तास लाईट मिळते . ती पण व्यवस्थित मिळत नाहीत. पिके वाळून चालली आहेत. सलग तीन वर्षे झाले पिके नीट न आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक ताणतणाव येत आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. याला मूळ कारण म्हणजे आम्हाला वीज मिळत नाही म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना त्रासून गेलेलो आहोत. त्यामुळे आज महावितरणच्या अधिकाऱ्यांना आम्ही बसवून घेतले आहे.
प्रमोद पवार, उपसरपंच सोनेगाव

गावांमधील शेतकऱ्यांनी मला सांगितले की या गावांमध्ये दोन शिफ्ट मध्ये शेतातील विद्युत पुरवठा चालतो. यामधील अर्धे गाव आज चालवले जाते व दुसऱ्या दिवशी अर्धे गाव चालविले जाते. शेतकऱ्यांनी स्टाटर चालू केल्यानंतर तो पाठाजवळ जाईपर्यंत लाईट खंडित झालेली असते. आंबेजवळगे या ठिकाणी विद्युत उपकेंद्र असून यामध्ये सहा गावे आहेत. जोपर्यंत फुल होल्टेजने शेतकऱ्यांना आठ तास वीज मिळत नाही आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला लेखी स्वरुपात लिहून देत नाहीत तोपर्यंत आम्ही या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बसवून घेणार आहोत. अमोल जाधव, जिल्हाध्यक्ष जनहित शेतकरी संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *