कुतूहल न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी आसिफ मुलाणी
कारीतील सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता बनला चिखलमय
कारी: कारी ता.उस्मानाबाद येथील सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठं मोठे खड्डे पडले आहेत तसेच या खड्ड्यात पाणी साचून चिखल झाले आहे.याच रस्ताने स्मशानभूमीला जावे लागते. ग्रामस्थांना या रस्ताने जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतात जाणारे वृद्ध शेतकरी , मंदिरात जाणारे भक्त याच रस्त्याने जाताना घसरून पडत आहेत,याच रस्त्यावर ग्रामपंचायतची पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन आहे तिला भरपूर ठिकाणी गळती लागलेली आहे. हे पाणी जाण्यासाठी रस्त्याच्या कडेने कुठली व्यवस्था करण्यात आलेली नाही.रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातच हे पाणी साचत असून साचलेल्या पाण्यामुळे डासांचा पादुर्भाव वाढत आहे,तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात या रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता तयार करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.