कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर- उपमहापौर काळेंच्या अटकेसाठी मनपा कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा
सोलापूर: संपूर्ण सोलापूर महापालिका वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ‘त्या’शिवीगाळ प्रकरणी उपमहापौरांच्या विरोधात महापालिका कर्मचारी संघटना एकवटली आहे तर उपायुक्त धनराज पांडे यांच्या पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभं राहिलं आहे.
हे आहे प्रकरण, मनपा उपायुक्तांना अर्वाच्च शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या उपमहापौर राजेश काळे यांना त्वरित अटक करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका कर्मचारी संघटना आज गुरुवारी सकाळी दि.31 डिसेंबर रोजी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
असा असेल मोर्चा, मनपा कर्मचारी सकाळी दहा वाजता महापालिका आवारात जमून जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढणार आहेत. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र यावे असे आवाहन कामगार नेते अशोक जानराव, जनार्दन शिंदे, माऊली पवार, प्रदीप जोशी, बाली मंडेपू , बापू सदाफुले, बाबासाहेब इंगळे, शशिकांत शिरसाट, तेजस्विनी कासार, अजय शिरसागर, सायमन गट्टू इत्यादी कामगार नेत्यांनी केले.