fbpx

पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात व्यक्तीचा खून

कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी:
महागाव-पिंपळगाव (ढाळे) रस्त्यावरील फाॅरेस्ट मध्ये अनोळखी इसमाचा अज्ञात आरोपींनी डोक्यात धारदार शस्त्राने मारून खून केल्याचा प्रकार आज दि.९ रोजी सकाळी उघडकीस आला.

अधिक माहिती अशी की, बार्शी तालुक्यातील महागावचे तंटामुक्त अध्यक्ष आण्णासाहेब पाटील यांनी फोन करून पांगरी पोलिसांना सांगितले  की, महागावच्या शिवारात महागाव ते पिपळगाव (ढाळे) जाणारे रोडलगत असलेल्या फारेस्टमध्ये एक इसम मयत अवस्थेत पडलेला दिसत असून त्याचा चेहरा पूर्णपणे विद्रूप अवस्थेत दिसत आहे.

त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोहेकॉ भोसले, पोहेकॉ कोठावळे, पोहेकॉ चौगुले, पोना घुगे, पोकॉ कवडे व पोकॉ बोदमवाड यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता तेथे एक अंदाजे ४० ते ४५ वर्ष वयाचे पुरूष जातीचे प्रेत मयत स्थितीत पडलेले दिसले. या मृताची उची अंदाजे साडेपाच फुट व रंग सावळा असून त्याचे अंगावर पांढऱ्या रंगाचा पट्या पट्ट्याचा रक्ताने माखलेला शर्ट व काळपट रंगाची पॅन्ट आहे. या मयताचा चेहरा कोणत्यातरी अज्ञात हत्याराने मारून व टणक वस्तुने चेचून विद्रुप केलेला दिसत आहे. त्याचप्रमाणे मयताचे अंगावर हातावर, पाठीवर व गळ्याभोवती ठिकठिकाणी खरचटल्या सारख्या जखमा दिसत आहेत. मयताचे डावे हाताचे पोटरीवर ‘ॐ’ असे व उजव्या हाताचे पोटरीवर ऊ’ ‘ॐ’ असे दोन वेळा व ‘श्रीराम’ गोंदल्याचे दिसत आहे. तसेच मयताचे शर्टाची बटणे उपडी असून छातीवर व पोटावर ठिकठिकाणी रक्ताचे डाग दिसत आहेत.

या मयताचा चेहरा चेचलेला असल्याने मयत व्यक्ती कोण आहे याबाबत आजूबाजूच्या गावात पोलीसांनी चौकशी केली परंतु या मयताची ओळख पटलेली नाही. तसेच या अज्ञात मयताच्या अगावरील जखमा वरून सदर अज्ञात मयत व्यक्तीस कोणी तरी अज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून कोणत्या तरी अज्ञात हत्याराने व टणक वस्तुने या अज्ञात मयत व्यक्तीचे डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले आहे. अज्ञातावर अनोळखी इसमाचा खून केल्याप्रकरणी पोलीस नाईक मनोज जाधव यांच्या फिर्यादीवरून पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *