कुतूहल न्यूज नेटवर्क
मुस्लिम जमात पांगरी यांच्या वतीने पोलिसांचा सत्कार
पांगरी प्रतिनिधी : मुस्लिम जमात पांगरी यांच्या वतीने पांगरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी सचिन हुंदळेकर यांची बदली झाल्यामुळे व नव्याने नियुक्त झालेले सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सपोनि सचिन हुंदळेकर म्हणाले की,पांगरी येथील ग्रामस्थांनी अशा कोरोना विषाणूच्या संकटात खूप सहकार्य केल्याचे समाधान व्यक्त केले तर येथील मुस्लिम समाज हा शांतताप्रिय व कायदा पाळणारा असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.रियाज बागवान यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.आरिफ शेख यांनी केले.
यावेळी सरपंच इंनूस बागवान,मुस्लिम जमातचे अध्यक्ष अखलाख पठाण,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष सादिक पठाण,महेमूद शेख,नाजीम सौदागर, सलमान सौदागर, सद्दाम रईस,शोएब बागवान,धीरज जानराव,सुरज शेख,सजीद शेख हे उपस्थित होते.यावेळी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यात आले.