कुतूहल न्यूज नेटवर्क
कारी (आसिफ मुलाणी): गाव पातळीवरचा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पन्नास कुटुंबासाठी एक पर्यवेक्षक नियुक्त करावा असे आदेश उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड यांनी दिले होते. आज उस्मानाबाद तालुक्यातील कारी याठिकाणी ग्रामविकास अधिकारी अनंत सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात नियोजन करण्यासाठी बैठक पार पडली.
कारीत माझ गाव कोरोना मुक्त गाव अभियान सुरू
1000 कुटुंबाचे गट तयार करून पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले. यामध्ये 6 आशाताई,6 अंगणवाडी ताई तसेच मदतनीस व शिक्षक आहेत. 50 कुटुंबासाठी एक पर्यवेक्षक असणार आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे .त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. 50कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यास त्याच्या संपर्कातील सर्वांची कोरोना चाचणी करून घेण्याबाबत मार्गदर्शन करणे, कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना , लसीकरण, घरोघरी फिरून सर्वेक्षण करणे आदी जबाबदारी या पर्यवेक्षकावर सोपविण्यात आली आहे.
यावेळी उपसरपंच खासेराव विधाते, ग्रामविकास अधिकारी अनंत सोनटक्के, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका ए. बी. उमरदंड, आरोग्य सेवक बी. आर. जगताप. पोलीस पाटील अमृता माळी, ग्रा. पं सदस्य, आशाताई, अंगणवाडीताई, मदतनीस , शिक्षक आदी उपस्थित होते.
नागरिकांनी मास्कचा वापर करावा विनाकारण एकत्र जमा होऊ नये. वारंवार साबणाने हात धुऊन, सॅनिटायझरचा वापर करावा. खासेराव विधाते, उपसरपंच,कारी.
शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे माझे कुटुंब माझी जबाबदारी ओळखून नियमांचं पालन करावे. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.अमृता माळी, पोलिस पाटील,कारी.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. ज्यांना थोडी काही लक्षणे आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये.
प्रत्येकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा सामाजिक अंतर पाळावे.प्रशासनास सहकार्य करावे. नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी ग्रामपंचायतीस संपर्क साधावा. अनंत सोनटक्के, ग्रामविकास अधिकारी,कारी.
गावातील युवकांनी काळाची गरज व संकटाची व्याप्ती लक्षात घेत अशा संकटाच्या प्रसंगी पुढे येऊन आपला यामध्ये सहभाग नोंदवावा. अमोल जाधव सामाजिक कार्यकर्ते,
कारी.