कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात तीन दिवसीय नगरभूषण श्रीमान भाऊसाहेब झाडबुके स्मृती ऑनलाईन व्याख्यान मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेत डॉ. महेश जोशी यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले की स्वातंत्र्याचे मुल्य प्रस्थापित करण्यासाठी आणि स्वातंत्र्याचे अमृतत्व टिकविण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे माध्यम आहे त्यामुळे अजूनही शिक्षणामध्ये आमूलाग्र बदलाची गरज आहे त्यासाठी शिक्षणाकडे पाहण्याचा सर्जनशील दृष्टिकोन आणि शिक्षण विषयक जाणीव जागृती बाळगण्याचे आवाहन डॉ. महेश जोशी यांनी केले.
नगरभूषण श्रीमान भाऊसाहेब झाडबुके स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन
कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. नवनाथ दनाने यांनी सहभागी सर्व शाखातील प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वागत करत व्याख्यानमाले मागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जगदीश झाडबुके होते. ते म्हणाले की बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक नगरभूषण श्रीमान भाऊसाहेब झाडबुके यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करताना, भाऊसाहेबांनी बार्शी तालुक्यामध्ये केलेल्या शैक्षणिक क्रांतीचा उल्लेख केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. वैभव वाघमारे, प्रा. अतुल ढवळे, प्रा. राजकुमार मोहिते यांनी परिश्रम घेतले. डॉ. गिरीश काशीद, डॉ. नवनाथ दनाने, प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मनोज गादेकर तर आभार डॉ. पुष्कर गांधी यांनी मानले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount