कुतूहल न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (दि. ७ जुलै) पार पडला. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. (Narayan Rane’s first reaction after taking oath as Union Minister)
शिवसेनेला शह देण्यासाठी तुम्हाला मंत्री केलंय का? राणेंनी दिले हे उत्तर…
दरम्यान, शिवसेनेला शह देण्यासाठी तुम्हाला केंद्रात मंत्री करण्यात आले का असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारले असता नारायण राणे म्हणाले कि, “शिवसेनेला शह देण्यासाठी मला मंत्री केलंय की कशासाठी केलंय, याचे कारण तर मला माहिती नाही. पण, मला मंत्री केलंय एवढं नक्की. आताच शपथ घेऊन आलोय. पण, भारतीय जनता पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पूर्ण करेन. माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.”