कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: पांगरी (ता. बार्शी) येथील राजीव गांधी केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेची नोव्हेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय संपादनुक सर्वेक्षणासाठी (नास) निवड झाली होती. या सर्वेक्षणासाठी बार्शी तालुक्यामधून एकूण आकरा शाळा निवडण्यात आलेल्या होत्या. यामध्ये राजीव गांधी केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेची निवड करण्यात आलेली होती. या परीक्षेसाठी ह्या शाळेमधील इयत्ता पाचवीचा वर्ग निवडण्यात आला होता. ही परीक्षा आश्रम शाळेमध्ये उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये पार पडली. या परीक्षेसाठी निरीक्षक म्हणून स्वाती मराळ यांनी तर क्षेत्र अन्वेषक म्हणून बार्शी पंचायत समितीचे विशेष तज्ञ मनोज जगदाळे यांनी काम पहिले.
पांगरीतील राजीव गांधी आश्रम शाळेमध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा उत्साहात
सर्वप्रथम मुलांची राष्ट्रीय संपादणूक चाचणी सन २०२१ घेण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी सर्वेक्षण प्रश्नावली घेण्यात आली. याच सोबत इयत्ता ५ वी. च्या शिक्षकांसाठी शिक्षक प्रश्नावली घेण्यात आली तर शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्यासाठी मुख्याध्यापक प्रश्नावली घेण्यात आली. ही परीक्षा विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापिका यांनी आनंदी आणि उत्साहीपने दिली. यावेळी मुख्याध्यापिका किरण बगाडे, उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे, पर्यवेक्षिका शैलजा राऊत, वस्तीगृह अधिक्षक वाहिद शेख, विषय शिक्षक शिवाजी बगाडे, संजय सोनवणे, बालाजी घावटे आदी उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount