मालवंडी प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधुन नाशिक येथील साई बहुद्देशिय संस्थेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा ‘ राष्ट्रीय अहिल्यारत्न पुरस्कार मालवंडी ( ता.बार्शी ) येथील अक्षरवेल ज्योति फाऊंडेशनच्या संस्थापिका ज्योति राजेंद्र सरवदे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अक्षरवेल ज्योति फाऊंडेशनच्या माध्यमातून ज्योति सरवदे यांचे सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य सुरु आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक विधवा, निराधार, विस्थापित महिलांचे प्रश्न सोडवून त्यांचे प्रबोधन करणे व गरजूंना आधार देण्याचे कार्य केले जात असून या फाऊंडेशनच्या महिला व विराग मधुमती यांच्यातर्फे सलग एक हजार तास गीते गाण्याचा विश्वविक्रम ‘ गिनीज बुकात ‘ नोंदवला आहे. खारघर, नवी- मुंबई येथून त्यांनी या फाऊंडेशनचा प्रारंभ केला . आता या फाऊंडेशनचे राज्यभर नेटवर्क सुरू आहे .
हा पुरस्कार वितरण सोहळा कोरोणाच्या पार्श्वभूमिवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ. शेफालीताई भुजबळ, इंडिया दर्पनचे साहित्य व संस्कृति विभागाचे संपादक देविदास चौधरी, अभिनेत्री स्मिता प्रभू, डॉ प्रशांत देवरे, संगीता पाटील,संजिवनी थोरात आदी उपस्थित होते.