कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शीत राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी निवडी बिनविरोध
बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेलच्या तालुकाध्यक्षपदी रफिक बेग तर तालुका कार्याध्यक्ष पदी रफिक बाताडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच यावेळी बार्शी शहरध्यक्ष पदी इब्राहिम शेख तर शहर कार्याध्यक्षपदी शहनवाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष पदी मौलाना अब्बास शेख यांचीही निवड करण्यात आली.
रविवारी बार्शी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. त्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष फारूक मटके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष फारूक मटके यांचा डॉ. आबीद पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव अॅड. सलीम नदाफ, राष्ट्रवादी काँग्रेस वैदकीय सेल चे महाराष्ट्र राज्य संघटक डाॅ.आबेद पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस विक्रम सावळे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णाताई शिवपुरे, अल्पसंख्याक सेलचे माजी तालुका अध्यक्ष सादिक पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा सुप्रियाताई गुंड, बार्शी शहराध्यक्ष अमोल आंधळकर,शहर कार्याध्यक्ष ॠषिकांत पाटील, नूतन राष्ट्रवादी युवक काॅग्रेस शहर कार्याध्यक्ष असिफ शेख,जिल्हा सरचिटणीस बाबू पटेल, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सरफराज शेख आदी उपस्थित होते.