कुतूहल न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादीच्या बार्शी तालुका विधानसभा अध्यक्षपदी नवाज मुलाणी
बार्शी: राष्ट्रवादीच्या बार्शी तालुका विधानसभा अध्यक्षपदी मळेगावच्या नवाज मुलाणी यांची निवड करण्यात आली. नवाज मुलाणी यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उत्तम कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली. निवडीबद्दल माजी पंचायत समिती सदस्य नीरंजन भूमकर, अध्यक्ष कुमार पौळ, माजी सरपंच निजामभाई शेख, धनगर समाज सेवा संस्थेचे तालुकाध्यक्ष सागर शेळके, आदम बागवान, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामहरी गाडे, कलीम मुलाणी, प्रफुल्ल गडसिंग, गणेश नलावडे, शेरखान शेख, शिवाजी धोत्रे, युनूस शेख, बाबा बुद्रुक, इम्रान मुलाणी, निशांत खांडेकर, सुहास बुद्रुक, अमीन मुलाणी यांनी अभिनंदन केले.