कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: दिनांक ५ जानेवारी ते ११ जानेवारी या सात दिवसांच्या दरम्यानच्या बी आणि सी सर्टिफिकेट एन.सी.सी. कॅडेटसाठी आयोजित केलेला कॅम्प बार्शी येथे शिवशक्ती मैदान या ठिकाणी पार पडला. या कॅम्पमध्ये ड्रिल, वेपन ट्रेनिंग मॅप रीडींग, काॅमन सब्जेक्ट लेक्चर्स अशा विविधांगी दैनंदिन ऍक्टिव्हिटीजने परिपूर्ण होता.
नाईन महाराष्ट्र बटालियनचा एनसीसी कॅम्प बार्शी येथे संपन्न
या कॅम्पमध्ये बार्शीतील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, श्री शिवाजी महाविद्यालय आणि बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज या कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्सनी सहभाग नोंदवला होता. कॅम्प नाईन महाराष्ट्र बटालियनचे ॲडम ऑफिसर कर्नल एस के चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जेसिओ प्रदीप फोंडे, पी आय स्टाफ हवालदार विष्णू माळी, हवालदार अमोल सावदे यांच्याकडून चालवला गेला. कॅम्प यशस्वी करण्यासाठी एनसीसी ऑफिसर मेजर एस डी पवार ,लेफ्टनंट शेख एस .एस., लेफ्टनंट किरण चपटे यांनी परिश्रम घेतले.