कुतूहल मीडिया ग्रुप
बार्शी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी ओबीसी विभागाच्या बार्शी शहराध्यक्षपदी नितीन भोसले यांची नियुक्ती करून नव्या दमदार नेतृत्वाची घोषणा केली आहे. ही नियुक्ती पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दिनांक १० जून रोजी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर यांच्या हस्ते नितीन भोसले यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नितीन भोसले यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) बार्शी ओबीसी शहराध्यक्षपदी नियुक्ती
या सोहळ्यात विश्वास भाऊ बारबोले, निरंजन भूमकर, कृष्णराज बारबोले, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे, जिल्हा उपाध्यक्ष इक्बाल पटेल, विधानसभा अध्यक्ष भारत देशमुख आणि शहराध्यक्ष किरण देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना नितीन भोसले म्हणाले, “पक्षाच्या धोरणांनुसार ओबीसी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन, त्यांच्यात ऐक्य व संघटन निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरून, बार्शी तालुक्यात संघटनेचा व्यापक विस्तार करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.”
या नियुक्तीमुळे पक्षाच्या विचारधारेचा प्रसार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी भोसले यांच्यावर आली आहे. शरदचंद्र पवार यांचे मार्गदर्शन, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बळीराम काका साठे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचे सहकार्य लाभत असताना, स्थानिक पातळीवर संघटना अधिक सशक्त होईल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांतून व्यक्त केला जात आहे.
नितीन भोसले यांच्या रुपाने बार्शीतील ओबीसी समाजाला नव्या आशेचा किरण मिळाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.