कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद: आसिफ मुलाणी
राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे, त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. आज राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची उस्मानाबाद इथून सुरूवात झाली. यावेळी तुळजापूर आणि उमरगा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की पक्ष संघटना बळकट हवी. बुथ कमिटी सक्षम केली तर येणार्या जिल्हा परिषद निवडणुकीला ताकदीने सामोरे जाता येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. शिवाय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठे कमी पडले याची माहिती जाणून घेतानाच आता येणाऱ्या निवडणुकीत आव्हानांना कशी मात द्यायला हवी, याबाबतचा आढावा त्यांनी घेतला. जयंत पाटील यांनी तालुकाध्यक्ष ते बुथ अध्यक्षांशी संवाद साधत दोन्ही मतदारसंघाची माहिती घेतली तसेच कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीही समजून घेतल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे, त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्ते जोडा : जयंत पाटील
यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, जयसिंगराव गायकवाड, जीवन गोरे, माजी आमदार राहूल मोटे, आमदार विक्रम काळे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, डॉ. प्रतापसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, महिला निरीक्षक प्रज्ञा खोसरे, युवक जिल्हा अध्यक्ष आदित्य गोरे, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा माडजे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे आदी उपस्थित होते.