कुतूहल न्यूज नेटवर्क- विजयकुमार मोटे
पंढरपूर मध्ये कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याचे निधन
पंढरपूर : कोरोनामुळे पंढरपूर तालुक्यातील भोसे गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजुबापू पाटील यांचे निधन.
भोसे ता. पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजुबापू पाटील यांच्यावर सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी मध्यरात्री उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. या दुःखद घटनेमुळे पंढरपूर मधील राजकीय क्षेत्राला धक्का बसला आहे.पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या असून त्यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांवर उपचार सुरू आहेत.
राजुबापू पाटील यांच्या मनमिळावू स्वभावामुळे पंढरपूर तालुक्यातील लोकांच्या मनात घर केले होते. ह्या दुःखद घटनेमुळे भोसे गावासह पंढरपूर तालुक्यातून दुःख व्यक्त होत आहे.