कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक महिला सेलच्या राज्यप्रमुखपदी
ॲड. मेघा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त कर्नल समीर कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब पंढरीनाथ जाधव, प्रदेश संघटक कॅप्टन वसंत आजमाने, नवी मुंबई शहर अध्यक्ष उदय भोसले उपस्थित होते.
NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक महिला सेलच्या राज्यप्रमुख ॲड. मेघा कुलकर्णी
पक्षाने दिलेल्या जबादारीसाठी मेघा कुलकर्णी यांनी आभार मानले. मी स्वतः एक माजी सैनिकाची पत्नी असून इतर सैनिकांच्या पत्नी, महिलांच्या हक्क व न्यायासाठी तसेच वीर नारी आणि त्यांचा परिवाराच्या सक्षमीकरणासाठी योग्य प्रयत्न करेल अशी भावना मेघा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
राज्यातील विवीध ठिकाणी निवासी असलेली माजी सैनिक यांचे संघटन मजबूत करण्यासाठी व त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या योजना, आरोग्य, मुलांचे शिक्षण, वीर नारी व सैनिक पत्नींच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यभर दौरा करून भेट घेणार असल्याचे देखील कुलकर्णी यांनी सांगितले, सोबतच त्यांनी कर्नल संभाजी पाटील यांचे देखील आभार मानले.